पुण्याजवळील भीमा कोरेगावात झालेल्या दंगलीच्या एका प्रकरणातील साक्षीदार पूजा सकट हिचा रविवारी दिनांक २२ एप्रिल रोजी तिचा मूर्तदेह जवळच्या शेतामधील विहिरीत आढळला .१ जाणेवारीच्या दंगलीत वडगाव ठाणचे रहिवाशी सुरेश सकट यांच्या घराचे नुकसान करण्यात आले होते .आपले घर जाळले जात असताना सकट यांची मुलगी पूजा आणि मुलगा जयदीप तिथे उपस्थित होते.हि जाळपोळ या दोघांनी आपल्या डोळ्यांनी पहिली होती .म्हणून त्यावेळी या दोघांना जमावाने मारहाणही केली होती .त्यावरून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या जमवाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली .तेव्हापासून सातत्याने त्यांना धमक्या मिळत होत्या .दोघेजण नेहमी दहशतीखाली वावरत होते .पूजाचे चुलते दिलीप सकट सांगतात .नेहमी प्रमाणे शनिवारी सकाळी सर्वाशी गप्पा मारल्या.दुपारच्या वेळेस घरातून खाली गेली .पण पुन्हा प्रत आली नाही.तिचा आम्ही खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला .पण ती सापडली नाही .त्या नंतर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारही दाखल केली .स्वतहा खूप शोधाशोध केली.पण काही हाती लागत नाही .अखेर शिनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या पूजाचा मृतदेह घराजवळील एका विहिरीत रविवारी सकाळी सापडला .