Tuesday, July 1, 2025
HomeMain Newsपुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात माजी खासदार राजू शेट्टी दाखल

पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात माजी खासदार राजू शेट्टी दाखल

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना दाखल करण्यात आले आहे. ब्लडप्रेशर वाढल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. गेल्या महिन्यात राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ९ सप्टेंबर रोजी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनावर मात करुन ते आठवड्याभराने घरी परतले होते. त्यानंतर काही दिवस त्यांनी घरी विश्रांती घेतली होती. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

राजू शेट्टींनी कोरोनामुक्त झाल्यानंतर विश्रांती घेतली होती. पण ते पुन्हा गेल्या महिन्याभरापासून शेतकरी प्रश्न घेऊन राज्यभर दौरा करीत होते. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांनी राज्यात दौरा करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी केली होती. तर गेले दोन दिवस ते शेतकरी प्रश्नांसाठी दिल्ली येथे आंदोलनात सहभागी झाले होते. ते बुधवारी सकाळी पुणे येथे दाखल झाले. नेहमीच्या तपासणीसाठी सायंकाळी चार वाजता ते डॉक्टरांना भेटणार होते. तर दुपारी बारा वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार होते.

पण सकाळी त्यांचा ब्लडप्रेशर वाढल्याने आणि दम लागत असल्यामुळे डॉक्टरांची त्यांनी भेट घेतली. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात राजू शेट्टी दाखल झाले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काही कारण नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments