Friday, August 8, 2025
HomeMain Newsपुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ नजीक 6 वाहनांचा विचित्र अपघात

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ नजीक 6 वाहनांचा विचित्र अपघात

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासुन सुरू असलेलं अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल रात्री 11 वाजता काशीळ येथे तब्बल 6 वाहनांचा विचित्र अपघात पाहायला मिळाला. यामध्ये मालट्रक पलटी झाल्याने एका 16 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. अपूर्व संतोष जाधव (वय- 14, रा. भणंग, ता. जावळी, जि. सातारा) असे सदर मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुट्टीसाठी कोकणात फिरायला गेलेले भणंग येथील जाधव आणि पवार कुटुंबीय रविवारी रात्री कारने परत यायला निघाले. त्याचवेळी काशीळ गावच्या हद्दीत आले असता त्यांच्या समोर असलेल्या मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजकाला धडकून मालट्रक उलटला. परंतु त्याचवेळी मालट्रकमध्ये असलेली चण्याची पोती पाठीमागून येत असलेल्या कारवर पडली. यात चालकाच्या पाठीमागे बसलेला अपूर्व जाधव हा त्याखाली सापडला.

या अपघातानंतर बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अपूर्व जाधवचा मृत्यू झाला. तर इतर ३ जणांना किरकोळ स्वरूपाची जखम झाली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. चारचाकी चालक सुनील शिवाजी लोखंडे (रा. आदर्शसंगम अपार्टमेंट, संगमनगर सातारा) यांनी या अपघाताची फिर्याद पोलिसात दिली असून, ट्रकचालक सेल्लूदुराई एम. (रा. नामाक्कल, तमिळनाडू) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार प्रविण शिंदे व प्रकाश वाघ करत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments