कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात जमावाने तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दिनांक १५ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली . तसेच जमावाने रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला . याबाबत रुग्णालयाच्या वैदयकीय अधिकाऱ्यांनी वाठार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि ,वाघोली( ता . कोरेगाव ) येथील रोहित पोपट शिंदे (वय २६ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती . आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर रात्री सडे दहा वाजण्याच्या सुमारास त्या युवकाला वाघोली येथील काही युवक व नातेवाईक उपचारासाठी पिंपोडे बुद्रुक येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले होते . तेथील डॉक्टरांनी त्याचा मुर्त्यू झाल्याचे सांगितले . तेव्हा त्या ठिकाणी नातेवाईकांच्या जमावाने गोंधळ घातला . नंतर पुन्हा मुर्त्यू झालेल्या युवकाला घेऊन जमाव ग्रामीण रुग्णालयात गेला . तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरनी त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सागिंतले . त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयातील केबिनच्या काचा फोडल्या ,सॅनिटाझर मशीन फोडले . महिला प्रसूती ग्रहाच्या खोलीचा दरवाजा फोडला ,तसेच दवाखान्यात प्रचंड गोंधळ घातला , रुग्ण सेवेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर व महिला कर्मचारणावर घीही जमावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला .
सातारा तालुक्यातील कुमठे येथे दोन दिवसापूर्वीच रात्रीच्या वेळेस एकाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता . त्यानंतर आता कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथेही जमावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रव्रुत्तीना आळा घालण्यासाठी आरोग्य केंद्रांना पोलिसांनी सरक्षण देणे गरजेचे आहे . तसेच गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातुन केली जात आहे .



