पाटण येथील सोनईचीवाडी ता.पाटण जि.सातारा हदीमध्ये सिद्धनाथ मंदिरा शेजारी असलेल्या अशोक शामराव माने यांच्या मालकीच्या शेडच्या आडोशाला तीन पत्ती नावाचा जुगार पैजेवर पैसे लावून खेळला जात असल्याबाबत ची माहिती पोलिसांना मिळाली .या माहिती वरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून सात लोकांना जुगार खेळत असताना पकडले.त्यावेळीस त्या ठिकाणी ९५६० रुपये किंमतीचे जुगार साहित्य रोख रक्कम,मोबाईल,व मोटार सायकल असा माल जप्त करण्यात आला व या सात जनाविरुद्ध पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
श्री.संदिप पाटील पोलीस अधिक्षक सातारा व विजय पवार अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या सूचना प्रमाणे श्री. पदमाकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शना नुसार पो.हवा.तानाजी माने,विजय शिर्के,पो.ना विजय कांबळे शरद बेबले यांच्या मदतीने हा छापा मारण्यात आला .या कारवाई मध्ये सहभाग घेतलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. संदिप पाटील पोलीस अधिक्षक सातारा व विजय पवार अप्पर पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले .