दररोज तीन ते चार टन माल बाजारात सिन्नर भागातील ठाणगाव,वडगाव,भाटमवाडी या तीन गावांमधून आज वर्षभर दररोज तब्बल तीन ते चार टन व प्रसंगी पाच टन परदेशी भाजीपाला गोवा,हैदराबाद,इंदोर,पुणे,दिल्ली,बंगळूर या मोठ्या शहरात पाठविला जातो.मागील सहा ते सात वर्षापासून लागवड ते विक्री व्यवस्था यशस्वी करण्यात सांगळे व त्यांच्या सहकार्यांना यश मिळाले आहे .
दररोज किवा ताजे उत्पादन मिळवण्यासाठी साधारण पाच गुंठे क्षेत्रात वर्षभर विविध परदेशी भाजीपाला पिके घेण्याची पिकपद्धती कारभारी सांगळे यांनी स्थापित केली आहे .मॉल,सुपरमार्केट यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला.गावपरिसरातील बेरोजगार युवकांनी या शेतीसाठी प्रोसाहित केले.आत्ता तीन गावांनमधून दररोज सुमारे तीन ते चार टन माल विविध बाजारपेठांना पाठवला जात असून शेतकराण्यांना दररोजचे उत्पन त्यातून मिळू लागले आहे .
नाशिक जिल्यातील सिन्नर तालुक्याचा बहुतांश भाग वर्षानवर्षे दुष्काळी राहिलेला आहे .पाणी टंचाई,मुरमाड जमीन बदलते हवामान या आव्हानाशी झुंजत असताना सिन्नरच्या जिद्दी शेतकर्यांनी कधीच हर मानली नाही .या प्रतिकुलतेतच संधी शोधत त्यांनी शेतीत नवे प्रयोग करण्याचा ध्यास घेतला .कमीत कमी क्षेत्रात नियमित उत्पन घेण्यावर भर दिला .तालुक्यातील वडगाव येथील कारभारी महादू सांगळे घे त्यापैकीच एक आहेत .त्यांना शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.गेल्या दहा वर्षापासून परदेशी भाजीपाला शेतीचे प्रयोग ते करताहेत.फयान वादळामुळे द्राक्षबागेचे नुकसान झाल्यानंतर ते कमी क्षेत्रावरील शेतीकडे वळले.त्यांची साधारण सहा एकर शेती आहे .त्यातील पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी पिकपद्धतीची नेटकी घडी बसवली आहे .त्यातून आपले अर्थकारण उंचावले आहे .
सांगळे यांची शेतीपद्धती
- सहा एकरापैकी सुमारे पाच ते दहा गुंठ्यावरती भाजीपाला
- वर्षभरात त्यात सुमारे तीन ते चार पिके.काहीवेळा दोनही.
- यातील पिके-ब्रोकोली,लाल कोबी,चायना कोबी
- उर्वरित क्षेत्रात कांदा,लसून,कोबी,फ्लॉवर व अन्य नियमित प्रकारचा भाजीपाला असं नियोजन
- पीक फेरपालट राहिली आहे महत्वाची .
- वर्षभर विविध टप्यात पिक उत्पादन सुरु .दररोज किवा वर्षभर ताजा पैसा हाती येत राहील अशी पिकांची सांगड .
- बाजारातील मागणीचा अदांज,हवामानाचा अभ्यास आणि कमीत कमी क्षेत्रावर गरजेनुसार उत्पादन या त्रिसूत्रीचा अवलंब .केलेला .
सांगळे म्हणाले कि,फयान वादळाने एक एकर द्राक्ष शेतीचे अतोनात नुकसान झाले होते .सलग दोन वर्ष बागेपासून उत्पादन मिळाले नाही .या दरम्यान सिन्नर येथीलच युवामित्र संस्थेने पंजाब ,दिल्ली,या राज्यात माहिती घेण्यासाठी गेलो .एका भागातील विक्री केंद्रात नेहमीच्या भाजीपाल्याचे प्रति किलोचे दर ५० रुपयाच्या आसपास होते .तर भाजीपाल्याचे दर १५० ते १६० रुपयाच्या आसपास होते .महानगरमध्ये अशा भाजीपाल्याला विशेष मागणी असते हे समजले .लागवड प्रयोग समजून घेतले .त्याचबरोबर नाशिकहून मुंबईला मला जातो .तोच माल आमच्या नाशिक किवा अन्य शहरात पुरवठा दारांकडून विक्रीस येतो ह बाब देखील समजली .गावी मित्रांशी चर्चा केली .पुन्हा,दिल्ली भागात फिरलो .परदेशी भाजीपाला प्रयोग पहिले .लागवड पध्दती समजून घेतली .जे विकते तेच पिकावाचे असा निर्धार केला होता .ब्रोकोलीने दिला हात साधारण २००९ ची गोष्ट .जुन्या द्राक्ष बागेत लागवड केली .ती बॉक्स मधून मुंबई बाजारात पाठविला.या ब्रोकोलीच्या खरेदीसाठी व्यापारनमध्ये स्पर्धा लागली होती .या ब्रोकोलीसाठी किलोला ९० रुपया पासून ते १६० रुपया पर्यंत बोली लागली .एका व्यापार्याने १२५ रुपये दराने सर्व खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला .त्या वेळी एक एकरात खर्च वजा जाता सुमारे सहा ते सात लाख रुपयाचे उत्पन मिळाले .त्या नंतर परदेशी भाजीपाला हा विषय अधिक गंभीरपणे घेण्यास सुरवात झाली .आज त्यात सातत्य ठेवले आहे .
संपर्क – कारभारी सांगळे -९४२२३२७७९६



