Friday, August 8, 2025
Homeदेशपहिली ते पाचवी इयत्तेची शाळा सप्टेंबरपर्यंत उघडण्याची शक्यता कमीच!

पहिली ते पाचवी इयत्तेची शाळा सप्टेंबरपर्यंत उघडण्याची शक्यता कमीच!

कोरोनाच्या संसर्गामुळे बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा उघडण्याची केंद्र सरकारने सुरू केली आहे. सोशल डिस्टंन्सिग आणि कोरोनाशी संबंधित बाबी चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याचे पालन करू शकतील म्हणून पहिल्या टप्प्यात ९ वी, १०, ११ वी आणि १२ च्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. ६ ते १० वर्षे वयोगटात असलेल्या पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील किमान तीन महिने शाळेत पाठवले जाण्याची कोणतीही शक्यता नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनुष्यबळ विकास मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेच्या (एनसीईआरटी) सहकार्याने शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करत आहे, असे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. वरिष्ठ वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना एकदाच शाळेत बोलावले जाणार नाही. या विद्यार्थ्यांना काही दिवस बॅचेसमध्ये शाळेत बोलावले जाईल. त्यामुळे त्यांना नवीन बैठक व्यवस्था आणि नियमांबाबतची माहिती देण्यास शाळा व्यवस्थापनाला वेळ मिळेल, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

सोशल डिस्टंन्सिगचे पालन होईल, अशा रितीने वर्गातील बैठक व्यवस्था करण्यात येईल. म्हणजेच वर्गातही दोन विद्यार्थ्यांतील अंतर किमान सहा फूट राहील. सर्व विद्यार्थी एकदाच शाळेत न बोलावता त्यांची बॅचेसमध्ये विभागणी केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एनसीईआरटीच्या मदतीने तयार करण्यात येत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मास्क घालणे सक्तीचे केले जाईल. प्रारंभीच्या काळात शाळांमधील कॅन्टिन उघडू नयेत, विद्यार्थ्यांना घरूनच लंच बॉक्स आणावेत, काही महिन्यांसाठी सकाळी होणारी प्रार्थनाही बंद ठेवावी आदी सूचनांचाही मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश असेल.

विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या कॅम्पसमध्ये येण्यास बंदी राहील. विद्यार्थ्यांसाठी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र गेटची व्यवस्था केली जाईल. संपूर्ण शाळा नियमितपणे सॅनिटाइज करून घेतली जाईल, आदी नियम व अटीही शाळा सुरू करताना घातल्या जाण्याची शक्यता आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments