यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे एनडीटीव्हीचे मॅनेजिंग एडिटर रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांना हा पुरस्कार हिंदी टीव्ही पत्रकारितेत योगदानासाठी मिळाला आहे. या पुरस्काराने अरुण शौरी, पी साईनाथ यांच्यानंतर रवीश कुमार यांच्या रुपाने आणखी एका भारतीय पत्रकाराचा सन्मान होणार आहे.