देवापुर ता.माण येथे गावातील पाच जणांनी दैनिक सत्य सह्याद्रीचे पत्रकार विशाल माने यांच्या मालकीच्या जागेतील 50हजार रूपये किमतीचे तारेचे कंपाऊड तोडून पत्रकार विशाल माने यांना लाथाबुक्क्यानी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी फिर्यादी पत्रकार विशाल माने देवापुर ता.माण येथे आजोळी आई व भाचा यांचे सोबत राहात असून, त्यांच्या राहत्या घरासमोरची जागा अनेक वर्षा पुर्वी वडिलांनी खरेदी केली आहे. सदर जागेत मागील महिन्यात 50हजार रूपये खर्च करून तारेचे कंपाऊड केले आहे.
8ऑक्टोबर रोजी सकाळी 9च्या सुमारास गावातील माणिक सुखदेव बाबर, तुषार माणिक बाबर, आबासो सुखदेव बाबर, सुशांत आबासो बाबर, जया उर्फ नंदाबाई माणिक बाबर या पाच जणांनी घरासमोरील अधिकृत तारेचे कंपाऊड गज,कुर्हाडी, व काट्याच्या सहाय्याने अतिक्रमण करून पाडावयास सुरूवात केली आहे.असा फोन भाचा रोहित बाबर यांचा फोन विशाल माने यांना आला असता,माने घरी आले व सदर आरोपीना जागेची कागदपत्रे, उतारा, जागेची पावती, व खरेदी खत, असून आम्ही 50हजार रूपये किमतीचे तारेचे कंपाऊड केले आहे. ते तोडू नका अशी विनंती केली. तर त्यांनी उलट तु परगावाहून देवापुर येथे जगायला आला आहेस.आम्ही वतनदार आहोत. आमचा नाद केला तर संपवून टाकू असे म्हणून फिर्यादी माने यांनाच लाथा बुक्क्यांनी मारहान केली. घराशेजारील तुकाराम बाबर हे भांडणाचा आवाज एकूण आले व त्यांनी सोडवासोडव केली.
या नंतर विशाल माने यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात वरील पाच जणांविरोधात मालकीचे असलेले व 50हजार रूपये खर्च करून बांधलेले तारेचे कंपाऊड तोडले, जिवे मारण्याची धमकी दिली, व लाथाबुक्क्यांनी मारहान केली म्हणून फिर्याद दाखल केली असून सपोनि गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्सपेक्टर रविद्र डोईफोडे अधिक तपास करत आहेत.