राज्यसभेच्या सहा जागांपाठोपाठ राज्यात विधानपरिषद निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यात राजकारण तापले आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारले आहे. त्याचा सामनाच्या रोखठोक सदरातून थेट समाचार घेण्यात आला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीपाठोपाठ राज्यात विधानपरिषद निवडणूक होणार आहे. मात्र विधानपरिषदेसाठी भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यावर सामनाच्या रोखठोक सदरातून सडकून टीका केली आहे. सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे की, विधानपरिषद निवडणूकीत पंकजा मुंडे यांना भाजपने डावलले. गोपिनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना पदे द्यायची पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे धोरण भाजपचे असल्याची टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांना उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फडणवीस स्वतःची फळी निर्माण करीत आहेत. मात्र यामध्ये निष्ठावान कार्यकर्ते दिसत नसल्याचे सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या अनेकांची मोट बांधण्यात आली आहे. त्यांना राज्यसभेपासून ते विधानपरिषदेपर्यंत सहज उमेदवारी मिळते. सदाभाऊ खोत, पडळकर, बोंडे यांना उमेदवारी मिळते. पण पक्षासाठी ज्या खडसे यांनी आयुष्य झिजवले त्यांना पक्ष सोडावा लागतो. पंकजा मुंडे यांचा अपमान करून त्यांना डावलले जाते. मात्र प्रेषित पैगंबर यांचा अपमान करणाऱ्या नुपूर शर्मा यांना फडणवीस फोन करू बेटी चिंता मत करो, असा धीर देतात तेव्हा आश्चर्य वाटते. कारण ज्या नुपूर शर्मामुळे देश दहशतवादी हल्ल्यांच्या स्फोटकांवर उभा आहे. त्यांना एक नेता पाठींबा कसा देऊ शकतो? असा सवाल सामनातून फडणवीस यांना केला आहे.