या निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे जाणीवपूर्वक प्रतिमाहनन केले जात आहे. निवडणुक आयोगाकडे याविरोधात करण्यात येत असलेल्या तक्रारींकडे आयोग मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वसार्हतेबद्दल शंका उपस्थित होत आहेत असे माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्वनी कुमार यांनी शुक्रवारी द हिंदू या वर्तमान पत्राने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले.
घेतली. त्या दरम्यान, राजीव गांधींवर केलेल्या टीकांमध्ये काहीही तथ्य नाही तरी देखील त्यांवर कॉग्रेसने केलेल्या तक्रारींची दखल निवडणुक आयोग घेत नसल्याने निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. हे आयोगाचे अपयश असल्याची टीका अश्वनी कुमार यांनी केली.
जय जनतेचा उदारमतवाद आणि लोकशाहीच्या व्यापकतेवरून विश्वास अडाला तर, या लोकसभेच्या निवडणुकीतील निर्णयावरही जनता शंका घेईल, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले. अश्वनी कुमार यांनी विभागीय मंत्रालयाचे प्रमुख म्हणून निवडणूक आयोगाच्या कामकाजाचे पर्ववेक्षण केले होते. त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजीव गांधी यांच्यावर थोपले जाणारे मोघम आरोप व त्याने होणाऱ्या राजकीय चर्चा हा ‘नवा कायदा’ झाला असल्याचे सांगितले. ‘आपली लेकशाही तिच्या सर्वात वाईट काळातून वाटचाल करीत आहे. केवळ व्यक्तिगत खिल्ली उडवणाऱ्या भाषणांनी सभ्यपणा आणि सुसंकृतपणाचेही अडथळे झुगारले आहेत. लोकशाही आणि सुसंस्कृतपणा यांचा परस्परात अटूट संबंध असतो. भूतकाळात वैचारीक मतभेत हे व्यक्तिगत वैमनस्यात रुपातरीत होत नव्हते’ असे अश्वनी कुमार यांनी सांगितले.
काॅग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारासंदर्भात वापरलेल्या ‘चोर’ या शब्दावरील अक्षेपाला, तो शब्द भारतीय जनता ‘चाेर’ हा शब्द कशा स्वरूपात घेते याचं स्पष्टीकरण दिले. दिलगिरीही व्यक्त कोली, मात्र मोदी हे कधीही त्यांच्या ढोबळ विधानांवरील अक्षेप खोडताना दिसलेले नाहीत.
अश्वनी कुमार यांनी, काॅग्रेसने या निवडणुकीत ‘आयडिया ऑफ इंडिया’ या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले होते. हा मुद्दा गुळगुळीत नसून, त्यात भीतीविरोधात नकाराचा, स्वतंत्र्याचा, असमानतेविरोधात समानतेचा उद्घोष होता. यात प्रत्येक भारतीयाला किमान उत्पन्न हमी योजनेचा पाया आहे. या सर्व परिस्थितीत भारताची लेकशाही अबाधित राखायची असल्यास प्रत्येक भारतीयाने याबाबत सजग होण्याची आज गरज असल्याचे सांगितले