Friday, August 8, 2025
HomeMain Newsनाश्त्यासाठी उतरलेल्या प्रवाशाच्या ट्रॅव्हलमधून 25 किलो चांदीचे दागिने लंपास

नाश्त्यासाठी उतरलेल्या प्रवाशाच्या ट्रॅव्हलमधून 25 किलो चांदीचे दागिने लंपास

पुणे- बंगळूर महामार्गावरून ट्रॅव्हल्सवर प्रवास करणाच्या प्रवाशांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, भुईंज- जोशीविहीर येथील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समधून 11 लाख 64 हजार रुपये किमतीचे 25 किलो चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सोमवारी घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रघुनाथ चोपडे (रा. तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे कोंडुसकर कंपनीच्या ट्रॅव्हल्समधून पुण्याला जावयाकडे निघाले होते. त्यांनी सोबत 25 किलो चांदीचे दागिने घेतले होते. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास चोपडे प्रवास करत असलेली ट्रॅव्हल्स नाश्त्यासाठी भुईंज- जोशीविहीर येथील एका हॉटेलवर थांबली. ट्रॅव्हलमधील प्रवासी नाश्त्यासाठी खाली उतरले. यावेळी इतर प्रवाशांसोबत विजय चोपडे हे सुद्धा नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये गेले.

त्यावेळी त्यांनी चांदीचे दागिन्याची काळ्या रंगाची सॅक बसलेल्या खुर्ची शेजारीच ठेवली होती. प्रवाशांसोबत नाष्टा करून परत ट्रॅव्हल्समध्ये आल्यानंतर चोपडे यांना सीटवर सॅक आढळून आली नाही. चोपडे यांनी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांनी चौकशी केली. तसेच सॅकचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. सॅकमध्ये तब्बल 25 किलो चांदीचे लहान मुलांचे व महिलांचे पैंजण दागिने होते. याची किंमत 11 लाख 64 हजार आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झालेली असून, पुढील तपास सहायक उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments