सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबाबत सहा महिन्यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते . परंतु त्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते . याच कार्यालयातील लाच घेताना एका कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे . या सामाजिक कार्यकर्त्यानी केलेले आंदोलन योग्यच होते . असे म्हणावे लागेल . आता तरी या कार्यालयातील अधिकाऱ्यांची केवळ चौकशी ना करता त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे . या पत्रकात असे सांगण्यात आले आहे कि सातारा जिल्ह्यातील सहायक धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत . जाणीवपूर्वक त्रास देणे ,मनमानी करीत तारखा देणे ,विनाकारण पक्षकारांचे प्रस्ताव नामंजूर करणे ,आर्थिक तडजोडी करणे ,त्या न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याची धमकी देणे ,याबाबत या कार्यालयातील अधीकारी ,कर्मचाऱ्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून ,या ऑफिस यामध्ये येणाऱ्या पक्षगार ,सामाजिक संस्था ,संघटना यांना न्याय द्यावा . संबंधित सहायक धर्मदाय आयुक्त आणि कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी १ डिसेंबर २०२३ रोजी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते . त्या आंदोलनाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते . आता याच कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडला आहे . आमच्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानेच अशा घटना घडत आहेत असे या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे . लाच घेताना सापडलेल्या कर्मचाऱ्याची चौकशी तर होईलच पण या कर्मचाऱ्यासोबत सामील असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे .कोणताही कर्मचारी एकमेकाला सामील असल्याशिवाय अशा घटना घडत नसतात . त्यामुळे सर्व अधिकाऱ्याना हि अटक झाली पाहिजे अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे . याबाबत सुशांत मोरे ,शंकर माळवदे ,पदमाकर सोलवंडे ,महारुद्र तिकुंडे या सामाजिक कार्यकत्यांनी या कारवाई बाबत मागणी केली आहे .
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची नुसती चौकशी नको त्यांनी अटक करावी -साताऱ्यातील सामाजिक कार्यकत्यांची मागणी
RELATED ARTICLES