भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकूण 15 राष्ट्रपती लाभले आहेत. भारताचे 15 वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. द्रौपदी मुर्म यांच्या आधी कोण कोण देशाचे राष्ट्रपती बनले आहेत याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारताचे 15 वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून रामनाथ कोविंद यांच्यापर्यंत 14 राष्ट्रपती झाले. आज आम्ही तुम्हाला त्या सर्व राष्ट्रपतींची माहिती सांगणार आहोत. त्यातील काही राष्ट्रपतींना भारताच्या सर्वोच्च सन्मानाने म्हणजेच भारतरत्न पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आलं.
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. सन 1950 ते 1962 या काळात त्यांनी भारताच्या राष्ट्रपतीचं पद भूषविलं. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले आणि बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने 1931 ला झालेल्या मिठाचा सत्याग्रह आणि 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला आणि राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. ते 12 वर्षे राष्ट्रपती होते.
डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन
डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ. झाकिर हुसेन
डॉ. झाकिर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. 13 मे 1967 ते 3 मे 1969 पर्यंत त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम केलं. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. 1957 ते 1962 या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केलं आणि 1962 ते 1967 पर्यंत भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. 1963 ला त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
वराहगिरी वेंकट गिरी
वराहगिरी वेंकट गिरी हे देशाचे चौथे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती पदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपतीपदावर होते. 1972 ला त्यांना भारत रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं.
फक्रुद्दीन अली अहमद
फक्रुद्दी अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून 1967 आणि 1971 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
डॉ. नीलम संजीव रेड्डी
डॉ. नीलम संजीव रेड्डी या देशाच्या सहाव्या राष्ट्रपती होते. 1977 साली त्यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी 37 पैकी 36 जणांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. याव्यतिरिक्त ते देशाचे सर्वात तरुण राष्ट्रपती होते. म्हणून त्यांनी आपला पगार 70 टक्के कपातीसह घेतला. 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982 असा त्यांचा कार्यकाळ होता.
ग्यानी झैल सिंग
ग्यानी झैल सिंग यांना भारताचे पहिले शीख राष्ट्रपती बनण्याचा मान मिळाला. ते राष्ट्रपती असतानाच 1984 मध्ये शीखविरोधी दंगली घडल्या होत्या आणि यात ऑपरेशन ब्लू स्टारचाही समावेश आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या देखील याच काळात झाली होती. 1982 मध्ये श्री नीलम संजीव रेड्डी यांच्या कार्यकाळाच्या शेवटी, ग्यानी जी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
रामस्वामी वेंकटरमण
रामस्वामी वेंकटरमण हे भारताचे राष्ट्रपती होते. वयाच्या ७७ व्या वर्षी ते राष्ट्रपती झाले. रामस्वामी वेंकटरमण देखील डॉ.राधाकृष्णन, डॉ.झाकीर हुसेन आणि व्ही. गिरी यांच्याप्रमाणे राष्ट्रपती बनण्याआधी उपराष्ट्रपती राहिले होते. 15 जुलै 1950 ला रामस्वामी वेंकटरमण यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. 35 वर्षांपूर्वी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा श्री व्यंकटरमण देखील राष्ट्रपती भवनाच्या त्याच सभागृहात उपस्थित होते हा योगायोग होता.
शंकर दयाळ शर्मा
हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत. त्यांचा कार्यकाळ 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997 असा होता. राष्ट्रपती होण्यापूर्वी, ते भारताचे आठवे उपराष्ट्रपती देखील होते, ते भोपाळ राज्याचे मुख्यमंत्री होते (1952-1956) आणि मध्य प्रदेश राज्यात कॅबिनेट स्तरावरील मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण मंत्रालयाचे काम हाताळले. त्यांनी केंद्र सरकारमध्ये दळणवळण मंत्री (1974-1977) म्हणून पदभार स्वीकारला. या काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (1972-1974) अध्यक्षही होते.
के.आर. नारायणन
कोचेरिल रामन नारायणन हे जुलै 1997 ते जुलै 2002 काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते. त्रावणकोर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला. भारतातील कुशल राजकारण्यांमध्ये त्यांची गणना होते. भारताच्या राजकारणातील विविध अस्थिर परिस्थितींमुळे त्यांचा कार्यकाळ खूपच गुंतागुंतीचा होता.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
अवुल पाकीर जैनुलाब्दीन अर्थात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी 2002 ते 2007 या काळात भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केलं होतं. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.
प्रतिभा पाटील
या भारतीय प्रजासत्ताकाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर 25 जुलै 2007 रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या 16 व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व 1962 ते 1985 दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.
प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात 1969 पासून सक्रिय असणारे मुखर्जी राष्ट्रपती बनण्याआधी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला होता. भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने 2008 ला पद्मविभूषण पुरस्कार दिला आणि भारत सरकारने 8 ऑगस्ट 2019 ला त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रामनाथ कोविंद
रामनाथ कोविंद हे भारताचे 14 वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे 2017साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि 65.65% मते घेऊन विजयी झाले होते. रामनाथ कोविंद 25 जुलै 2017 पासून या पदावर आहेत. त्याआधी ते बिहार मध्ये राज्यपाल या पदावर 2015 ते 2017 पर्यंत कार्यरत होते.