देशातील मोठी आयटी कंपनी विप्रोचे फाऊंडर चेअरमन अजीम प्रेमजी Crore) आणि प्रोमोटर ग्रूपने 22.8 टक्के शेअर बायबॅक ऑफरमध्ये विकले आहेत. शेअर बायबॅकमध्ये प्रेमजीने 9,156 कोटी रुपयांचे शेअर विकले. त्यानंतर त्यांची भागीदारी 74 टक्क्यांवरुन घसरुन 73 टक्के झाली आहे ल्या वर्षी डिसेंबरमध्ये विप्रोने 9,500 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक ऑफर उघडलं होतं. या प्रोग्रामअंतर्गत कंपनीने 400 रुपये प्रती शेअरच्या दराने 23.75 कोटींचे इक्विटी शेअर विकत घेतले होते.
प्रेमजी यांचे दोन परोपकारी ट्रस्ट आहेत. ‘अजीम प्रेमजी ट्रस्ट’ (आणि ‘अजीम प्रेमजी परोपकारी पहल’ यामधून 7,807 कोटी रुपये कमावतील. यामुळे ते भारतातील सर्वात मोठं चॅरिटेबल ट्रस्ट बनेल.
हा ट्रस्ट शिक्षण, पोषण आणि अपंग व्यक्ती, स्ट्रीट चिल्ड्रेन, घरगुती हिंसाचारातून बचावलेल्यांसह असुरक्षित गटांना मदत करत आहे. या क्षेत्रात पैसा लावून अशा लोकांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.
आयटी कंपनी विप्रोचे अजीम प्रेमजी दानधर्माच्या कामात मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 परोपकारी कामांमध्ये प्रत्येक दिवशी 22 कोटी रुपये म्हणजेच एकूण 7,904 कोटी रुपयांचं दान दिलं. यामध्ये ते सर्वात वरच्या स्थानावर आहेत.
गेल्या सप्टेंबरमध्ये IIFL वेल्थ हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये प्रेमजी 1,14,400 कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर होते. प्रेमजी यांनी पहिले देखील आपल्या दानधर्माच्या कामांसाठी 21 अब्ज डॉलर खर्च करण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्याचं हे दान आशिया खंडातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात मोठ्या दानवीरांपैकी एक आहे.