Friday, August 8, 2025
Homeदेशदेशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, मात्र चार स्फोटांनी आसाम हादरलं

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, मात्र चार स्फोटांनी आसाम हादरलं

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, तिकडे आसाम स्फोटांनी (Assam explosion) हादरुन गेलं आहे. आसाममधील विविध भागात चार स्फोट झाले. दोन स्फोट डिब्रूगढमध्ये, एक सोनारीत आणि एक स्फोट दुलियाजन इथे पोलीस स्टेशनजवळ (Assam explosion) झाल्याची माहिती आहे. सध्यातरी या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

आसाममधील डिब्रूगढमध्ये राष्ट्रीय महामार्ग 37 वर एका दुकानाजवळ स्फोट झाला. तीन ग्रेनेडद्वारे हा स्फोट घडवण्यात आला.

या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. “डिब्रूगढमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. याप्रकरणी आम्ही तपास सुरु केला आहे. स्फोट कोणी आणि कसा केला याबाबतची माहिती मिळवत आहोत” असं आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी सांगितलं.

यापूर्वीही सहा दिवस आधी सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या तयारीदरम्यान, चराईदेव जिल्ह्यात स्फोट झाला होता. त्यावेळी झालेल्या स्फोटात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं  होतं.

आसाममध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात मोठी आंदोलन सुरु होती. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती. मात्र आज प्रजासत्ताक दिनाला स्फोट झाल्याने आसाममधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments