सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात उद्या मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे.त्यात आज कृषी कायद्याविरोधात भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला नागरिकांनी उस्फुर्त प्रतीसाद दिलेला आहे. असे विधान शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान, मागच्या १० ते १२ दिवसांपासून शेतकरी थंडी वाऱ्याच्या पर्वा न करता, सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमारेषेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातीलच नाही, तर जगातील नागरिकांचे कर्तव्य आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगातील अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत.
सरकारने मोठं मन करून विचार केल्यास, आंदोलनामुळे तणावाखाली येण्याची सरकारला गरज नाही. कारण, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची व्यथा ऐकायलाच हवी, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशभरात बंदला चांगला प्रतिसाद असून लोकं उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी आहेत, असेही विधान राऊत यांनी केले होते.