Friday, August 8, 2025
Homeलेखदेशद्रोही कृत्य

देशद्रोही कृत्य

९ ऑगस्ट रोजी जंतर मंतर येथे काही विकृत लोकांकडून भारतीय संविधान उघडपणे जाळण्यात आले .देशाचे संविधान जाळत असताना हा जमाव आरक्षण मुर्दाबाद,आंबेडकर मुर्दाबाद,एसी,एसटी कायद्याचा मुर्दाबाद,संविधान मुर्दाबाद,संविधान जलाओ देश बचाओ ,आंबेडकर जलाओ ,देश बचाओ आरक्षण के दलाओ को जुते मारो सालो को ,अशा प्रकारच्या घोषणा देत होते .तसेच मनुवाद जिंदाबाद,मनुवादी जिंदाबाद ,अशा घोषना या जमावाकडून येत होत्या.

“आरक्षण विरोधी अभियान” चालविणाऱ्या काही समाजकंटकाकडून हे देशदोही कृत्य केलेले आहे ,या घटनेत सामील असलेल्या एका व्यक्तीने या संबंधित व्हीडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला होता .हा व्हीडीओ व्हायरल झाला आणि सर्वानांच धक्का बसला कारण स्वातंत्र भारताच्या इतिहासामध्ये असे पहिल्यांदाच घडत आहे कि देशाची कार्यरत राज्यघटना कुणीतरी जाळून टाकली .देशाच्या राजधानीत जेव्हा काही समाजकंटक देशाची राज्यघटना जाळत होते तेव्हा कायदा सुव्यवस्थेचे रक्षणकर्ते पोलीस मात्र निमूटपणे उघड्या डोळ्यांनी बाजूला उभे राहून हा संपूर्ण प्रकार बघत होते .पोलिसांच्या डोळ्यासमोर देशातील सर्वात गंभीर गुन्हा घडत होता,देशद्रोह घडत होता मात्र पोलिसांना हस्तक्षेप  करावासा वाटला नाही .त्यामुळे या घटनेला त्या समाजकंटकासहित पोलीस देखील तेवढेच जबाबदार आहेत .

या संतापजनक घटनेमध्ये अजून एक गोष्ट विशेष होती ,मोदी सरकार मुर्दाबाद,नरेंद्र मोदी मुर्दाबाद,अमित शहा मुर्दाबाद,नितीश कुमार मुर्दाबाद अशा घोषणा सुद्धा हा जमाव देत होता .त्यामुळे या घोषणा देण्यामागे या लोकांचा काय उदेश असावा हे सगळ्यांनाच माहित आहे .नामानिराळे होण्याची हि पद्धत आत्ता जुनी झाली आहे .निवडणुका जवळ आल्याने जाती जातीमध्ये भांडण लावणे ,समाजात  कलह निर्माण करणे ,दंगल घडविणे,समाजामध्ये polarization घडविणे हे काही संघटना व राजकीय पक्षाचे जुने अजेंडे आहेत .विकासाच्या मुद्यावर हे चारही मुंड्या चीट झाले आहेत .यांच्या सर्व मोठ-मोठ्या घोषणा हवेत विरून गेल्या असताना परत निवडून यायचे असल्यास समजाला संभ्रमित करायचे आणि डाव साधायचा असा यांचा प्रयत्न आहे .नाहीतर पाठीशी कुणीतरी भक्कम उभे असल्याशिवाय चार टाळकी संविधान जाळण्या पर्यत गंभीर कृत्य कधीच करणार नाहीत .या सर्व कृत्याला व षडयंत्राला कुणीही बळी पडू नये ,त्यांना दंगली घडवायच्या आहेत  हे स्पष्ट आहे .त्यावर एकच उत्तर त्यांना अपेक्षित असे काहीही न करणे मात्र ज्या नतद्रष्टना संविधान जाळण्याचे कृत्य केले आहे .त्यांच्यावर ‘ prevention of Insults to National Honor Act 1971 (Amendment) 2005 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबधितांवर देशदोहाचा खटला चालला पाहिजे या करिता सर्वांनी आपल्या स्तरावर किवा संघटीतपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments