गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना विविध कारणांनी झटका दिला आहे. आता पश्चिम महाराष्ट्र तसेच सहकार क्षेत्रात नावाजलेली दि कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत गेल्याने बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. या कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.
रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बॅंकेची दिवाळखोरी जाहीर करत बॅंक अवसायनत गेल्याचे जाहीर केले आहे. त्या बॅंकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.
उपनिबंधक मनोहर माळी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ”कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला आहे. याबाबतचे आदेश काल रात्री उशिरा पारीत झाले आहेत. सकाळी ते मिळाले आहेत. त्याबाबत बॅंकेतही त्याची स्थळप्रत लावण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आदेशानुसार, बॅंकेत पाच लाखाआतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत.
त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बॅंकेच्या दोन विस्तारीत कक्षासह 29 शाखा आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे त्या संस्था विस्तारलेल्या आहेत. त्या सगळ्याच संस्थाचे कामकाज बंद राहणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केल्यानंतर आता सहकार आयुक्तींनी कऱ्हाड जनता बॅंक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अवसायानिक म्हणून माझीच नेमणूक केली आहे”.
या बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे २९ शाखा व ३२ हजार सभासद आहेत. बँकेवर झालेल्या या कारवाईमुळे अनेकांना सभासदांना झटका बसला आहे. बँकिंग परवाना रद्द झाल्याचे आदेश आज प्राप्त झाले. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर करत बँक अवसायनात गेल्याचे जाहीर केले आहे. बँकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.