Friday, August 8, 2025
HomeUncategorizedदहावीच्या निकाला संदर्भात कोणतीही घोषणा नाही

दहावीच्या निकाला संदर्भात कोणतीही घोषणा नाही

सातारा : १० वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार ? असा प्रश्न पडलेल्या विधार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे .महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी आणि पालक वाट पाहत आहेत .आता  विद्यार्थीची प्रतीक्षा आता संपणार असल्याचे  दिसत आहेत .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळातर्फे १० वीच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे  म्हंटले  जात आहे .मात्र अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही .बोर्डाच्या www.mahresult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विधार्थी आपला निकाल पाहू शकतील.महाराष्ट राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१८ मध्ये १० वीची परिक्षा घेण्यात आली होती .मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती .यामध्ये ९ लाख ७८ हजार २१९ मुलींचा समावेश आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments