Friday, August 8, 2025
HomeMain Newsदबाव तंत्रांचा वापर करून विलासपूरमध्ये विरंगुळा केंद्र उभा करण्याचा प्रयत्न

दबाव तंत्रांचा वापर करून विलासपूरमध्ये विरंगुळा केंद्र उभा करण्याचा प्रयत्न

विलासपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कोयना सोसायटी व सहजीवन सोसायटीला लागून ओढ्यालगत मोकळी जागा असून या ठिकाणी मागील ग्रामपंचातीच्या पंचवार्षिक आराखड्यामध्ये  विरंगुळा  केंद्राचे  काम करण्याबाबत आराखड्यामध्ये सहभाग केला आहे. सदर  जागा हि अपुरी व विरंगुळा केंद्रास पुरेशी नसून या ठिकाणी विरंगुळा केंद्र बसत नसताना हि केवळ राजकीय दबाव वापरून शासनाच्या पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता  आहे  . या विरंगुळा केंद्रास कोयना सोसायटीमधील सभासदाचा विरोध असून या सभासदांनी त्यांच्या सोसायटीच्या मिटींग मध्ये  विरंगुळा केंद्रासाठी  आमची कोणती हि जागा वर्ग केली नसल्याचे सांगतिले.अस्तित्वात नसलेल्या सहजीवन सोसायटीच्या  जागेत सदर विरंगुळा केंद्र बसत नसताना हि  त्याच जागेत विरंगुळा केंद्र बांधण्याचा हट्ट का धरला जातो आहे हा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे.  नेत्याच्या टक्केवारीसाठी  शासनाच्या पैसे असेच उधळायचे का ? जर विरंगुळा केंद्र  बांधायचे असेल तर  जिथे मुबलक जागा असेल अशा ठिकाणी बांधावे असे ग्रामस्थानमधून मागणी होत आहे. विरंगुळा केंद्रसाठी  30Ẋ30 जागा लागते वॉकिंग ट्रॅक करावा लागतो . तेवढी जागा या ठिकाणी भरत नसताना  तसेच सदर विरंगुळा केंद्र हे शासनाच्या मानकांनुसार  बसत नसल्याने . राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे या ठिकाणी विरंगुळा केंद्र  उभा करण्याचा घाट बांधला जात  असून शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे . या जागेत विरंगुळा केंद्र बांधण्यास ग्रामस्थाचा विरोध आहे . ग्रामपंचायतीच्या  परिसरात जिथे जागा  उपलब्ध असेल अशाच ठिकाणी हे विरंगुळा केंद्र घ्यावे जेणेकरून  ते  विरंगुळा केंद्र शासनाच्या मानकांनुसार  होईल व त्याचा  फायदा सर्वसामान्य ग्रामस्थाना होईल . व  शासनाच्या निधीचा वापर योग्य प्रकारे  करता येईल. विलासपूर मधील राजकीय मंडळींनकडून जाणीवपूर्वक दबाव टाकून राजकारण करून विरंगुळा केंद्र उभारणेचा प्रयत्न चालू आहे . विरंगुळा केंद्रासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसताना हा हट्ट कुणासाठी व  कशासाठी केला जात आहे ? अशी चर्चा ग्रामस्थानमधून होताना दिसत आहे . नियोजित विरंगुळा केंद्राच्या जागेतून रस्ता  गेलेला आहे . या रस्त्यावरून घंटागाडी,गॅसच्या गाड्या ,त्याचबरोबर इतर वाहनांची येजा होत असते. दत्त मंदिर परिसरात गाड्यांना वळण्यासाठी जागा नसल्याने  वाहने एका बाजूने जाऊन दुसऱ्या बाजूनी बाहेर पडत असतात . जर सदर जागेत विरंगुळा केंद्राचे बांधकाम केल्यास घंटागाडी . गॅसच्या गाड्या ,यांना वळण्यासाठी जागाच राहणार नाही व दुसरा पर्यायी मार्ग हि नसल्याने या गाड्या दत्त मंदिर परिसरात येणार नाहीत . त्यामुळे ग्रामस्थानची गैरसोय होणार आहे . नियोजित विरंगुळा केंद्राच्या जागेमधून  जानाई मळाई ,दत्त मंदिर ,भैरोबा अशा तीन देवस्थानच्या पालख्या येत असतात .जर या जागेमध्ये बांधकाम केल्यास या तीन देवस्थानच्या पालख्याचा येण्याजाण्याचा रस्ता बंद होणार आहे . त्यामुळे विलासपूर मध्ये  पालख्या येऊ शकणार नाहीत व भावविकांची गैरसोय होणार आहे . अशा अपुऱ्या जागेत विरंगुळा केंद्र बांधून ग्रामस्थानची गैरसोय करण्यापेक्षा सहजीवन सोसायटीच्या मोकळ्या जागेत हे विरंगुळा केंद्र बांधावे अशी मागणी ग्रामस्थानमधून होत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments