Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तब्बल 11 वर्षांनी लागणार निकाल

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तब्बल 11 वर्षांनी लागणार निकाल

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची ते मॉर्निंग वॉकला गेले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अगदी जवळून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर 2014 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयकडून विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी 20 साक्षीदारांची साक्ष नोंदविली.

या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, एडवोकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली होती. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली होती.

हत्येनंतर आठ वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये पुणे विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. डॉ. दाभोलकर यांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू होता, अशी धक्कादायक बाब उघड झाली.

अटक करण्यात आलेल्या पाच आरोपीवर 2021 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले. अडीच वर्षे खटला चालल्या नंतर निकालाचा दिवस येवून ठेपलाय. विशेष न्यायाधीश पी.पी.  जाधव यांच्या न्यायालयात हा निकाल सुनावण्यात येणार आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आलेल्या आरोपींवर कलम 302 म्हणजे हत्या, कलम 120 ब म्हणजे गुन्ह्याचा कट रचने त्याचप्रमाणे शस्त्र अधिनियमना संबंधीचे कलम 34 नुसार आरोप निश्चित करण्यात आलेले आहे. आरोपींवर युएपीए देखील लावण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments