आपण दररोज दातांची स्वच्छता राखण्यासाठी आणि तोंडातील दुर्गंधी पळवण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो. तुम्ही बघितले असेल की आपल्या घरातील टूथपेस्टवर लाल, हिरव्या, काळ्या आणि निळ्या रंगाचा पट्ट्या असतात.
वेगवेगळ्या ब्रँडनुसार या पट्ट्यांचा रंग वेगळा असतो. पण या पट्ट्या कशासाठी असतात याबद्दल लोकांचे खूप गैरसमज आहेत. चला तर जाणून घेऊया या पट्ट्यांबद्दल. आता यामध्ये असा गैरसमज आहे की, निळ्या रंगांची पट्टी असेल तर ती औषधी टूथपेस्ट असते.
हिरवी पट्टी म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक टूथपेस्ट तसेच लाल पायटी5 म्हणजे नैसर्गिक आणि रासायनिक मिश्र टूथपेस्ट, काळ्या रंगाची पट्टी म्हणजे पूर्ण रासायनिक टूथपेस्ट. असे बरेच मेसेज किंवा अफवा पसरत आहेत पण हे सर्व दावे खोटे आहेत.
काळ्या रंगाची पट्टी असलेली टूथपेस्ट ही चांगली असते त्यामुळे घाबरू नका. या पट्ट्यांचा मानवी आरोग्याशी काहीही संबंध नाही. मुळात या पट्ट्या उत्पादनाचा एक भाग आहेत. रंगीत मार्कला आय मार्क म्हणतात. ट्युबला कुठे कापायचे आणि कुठे दुमडायचे यासाठी हे मार्क्स दिले गेलेले असतात.
कोलगेटच्या वेबसाईटवरसुद्धा याबद्दल माहिती दिलेली आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगण्यात आले आहे. असे मेसेज जे तुम्हाला मिळाले असतील तर दुर्लक्ष करा. जर तुम्हाला चांगली टूथपेस्ट हवी असेल तर डेंटिस्टचा सल्ला घ्या,