माहिती अधिकार ,सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मोठे भूखंड प्रकरण नुकतेच उघडकीस आणले आहे . ते प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारे आहे . यामध्ये जीएसटी मुख्य आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांच्या नातेवाईकांनी झाडानी तालुका महाबळेश्वर येथे ६४० एकर भूखंड खरेदी करून त्यामधील ३५ एकरावर अनधिकृतपणे रेसॉर्टचे बांधकाम सुरु केल्याचे निर्दशनास आले आहे .या बाधंकामध्ये बेकायदा ,खाणकाम,वन्यजीव व वन कायदयाचे उल्लंघन केले आहे व पर्यावरणाला धोका निर्माण केलेला आहे .या प्रकरणी मा . जिल्हाधिकारी सातारा यांनी वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव . उपविभागीय अधिकारी वाई ,कार्यकारी अभियंता महावितरण ,सातारा आणि कार्यकारी अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत . मूळ नंदुरबारचे रहिवाशी असलेले चंद्रकांत वळवी व त्यांच्या नातेवाईकांनी झाडानी हे संपूर्ण गावच विकत घेतले आहे . वळवी यांचे त्या ठिकाणी रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे . पर्यावरणी दृष्ट्या हा अतिसंवेनशील भाग असतानाही त्या ठिकाणी खोदकाम ,खाणकाम ,रस्ते आदी कामे केली असून वनसंपदा व वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाले आहे . संबधीत कोणत्याच विभागाच्या परवानग्या घेण्यात आलेल्या नसताना त्याकडे प्रशासन डोळेझाक का करीत आहे . या वळवी यांच्यावर जर १० जून पर्यंत कारवाई झाली नाही तर १० जूनपासून उपोषण करणार असल्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे . सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सुशांत मोरे यांनी लेखी तक्रार केली आहे . या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सातारा यांनी वाई प्रांताधिकारी याना याप्रकरणी चौकशी अधीकारी म्हणून नियुक्त केले आहे .
जी एसटी आयुक्त चंद्रकांत वळवी भूखंड प्रकरण ,महाराष्ट्राला धक्का देणारे
RELATED ARTICLES