सातारा प्रतापगंज पेठेतील बाधिताचे निकट सहवासहित म्हणून विलनीकरणात दाखल असलेले दोघे वय वर्ष ४० आणि ४७ यांचे आणि मुंबई वरून प्रवास करून आलेले कोरेगाव तालुक्यातील एक २९ वर्षीय युवक ११ तारखेपासून कोरोना केअर सेंटर मध्ये होता . या तिघांचे अहवाल हे कोरोना बाधित आल्याची माहिती सिविल सर्जन आमोद गडीकर यांनी दिली .
२९ वर्षीय युवक विनापरवानगी मुंबई येथून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आत्तापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तीची संख्या १२८ झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधित रुग्णांची संख्या ६५ आहे. तर कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले ६१ रुग्ण असून कोरोना बाधित मृत्यु झालेले २ रुग्ण आहेत .