Sunday, August 10, 2025
HomeMain Newsजिल्हा बँक निवडणुकीवरुन उदयनराजेंनी विरोधकांना लगावला टोला!

जिल्हा बँक निवडणुकीवरुन उदयनराजेंनी विरोधकांना लगावला टोला!

मला सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते, माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, विरोध मला करा पण सभासदांची जिरवू नका, असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी यावेळी बोलताना ते म्हणाले, असं का? लै मस्ती आली आहे? बघू. तुम्ही इकडचे, तिकडचे बोलवून घ्या लोकांना…आपण टाईट करु, जिरवू. माझी नका जिरवू, मेहेरबानी करा, माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही, हात जोडून विनंती करतो. शेतकरी सभासदांची बँक आहे, त्या गोरगरीब शेतकऱी बांधवांच्या वतीने मी विनंती करतो, त्यांची जिरवू नका. हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जिरवा.

साताऱ्याच्या दोन्ही राजांचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संघर्ष सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये समावेश केला नसल्याबद्दल काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी जाब विचारला होता. याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असे स्पष्ट करत बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे झालेल्या बैठकीत बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यात आले. खासदार उदयनराजेंना सत्ताधारी पॅनलमधून उमेदवारी देण्याबाबत एकमत न झाल्यामुळे उदयनराजेंच्या विरोधात सत्ताधारी पॅनेलने निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी पॅनेलच्या आमदार मकरंद पाटील यांच्यासह राजेंद्र राजपुरे व शिवरूपराजे खर्डेकर हे तिघेही एक एक अर्ज आल्याने बिनविरोध झाले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments