वादग्रस्त माजी ट्रेनी आयएएस पुजा खेडकर विरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणारेत…पूजा खेडकरच्या नियमबाह्य वर्तनाचा अहवाल सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला पाठवला होता…त्यानंतर तिचे सगळे प्रताप उघडकीस आले आणि तिच्यावर कारवाईपण करण्यात आली… मात्र, दरम्यानच्या काळात पूजा खेडकरने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती… वाशिम पोलिसांकडून ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती… या तक्रारीत पूजा खेडकरने दिवसेंवर अनेक गंभीर आरोप केलेत… तर दिवसेंनी आपला छळ केल्याचा उल्लेखही पूजाने तक्रारीत केलाय…या पार्श्वभूमीवर सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय.