सातारा जिल्यातील जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे घरात पेटवलेल्या दिव्याच्या माध्यमातून आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली . या आगीत दोन घरे जाळून खाक झाली असून मोठ्या नुकसान झाले आहे . यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .
याबाबत अधिक माहिती अशी कि ,जावळी तालुक्यातील मामुर्डी येथे आग लागल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली . या आगीत दोन्ही घरातील उपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे . गावातील एक घरात दिवा लावण्यात आला होता . त्या दिव्यापासून आग इतरत्र पसरल्याने त्या आगीने रौद्ररूप धारण केले .आगीचे लोट वाढल्यानंतर घरातून धूर बाहेर येऊ लागल्याने घरच्या परिसरात राहात असलेल्या लोकांच्या ते लक्षात आले . त्यावेळी गावातील सर्व ग्रामस्थानी एकत्र येत आग विझविण्याचा प्रयत्न केला . मात्र ,आगीचे लोट जमिनीपासून वर ३० ते ३५ फूट असल्याने तात्काळ आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी पाण्याचे टँकर पाठवले . जावळी व सातारचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सातारा अजिक्यतारा सहकारी कारखान्यावरून अग्नीशामक बंब मामुर्डी येथे पाठवले .त्यानंतर तब्बल एका तासानंतर संपूर्ण आगा\आटोक्यात आणण्याची कर्मचारण्या यश आले .