Friday, August 8, 2025
Homeदेशजाणून घ्या विशाखापट्टणममध्ये गळती झालेल्या स्टायरीन गॅसबद्दल

जाणून घ्या विशाखापट्टणममध्ये गळती झालेल्या स्टायरीन गॅसबद्दल

आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथे एलजी पॉलिमार कंपनीमध्ये विषारी गॅसगळतीची घटना घडली. लॉकडाऊनच्या काळात या कंपनीला बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता ही कंपनी पुन्हा उघडण्याची तयारी सुरू होती. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कंपनीच्या आजुबाजूचा 3 किमीचा परिसर रिकामा केला आहे. 5 गाव खाली करण्यात आले असून, शेकडो लोकांना डोकेदुखी, उल्टी, श्वास घेण्यास समस्या येत आहे. गळती झालेल्या गॅसचे पीव्हीसी अथवा स्टायरीन आहे. हा गॅस धोकादायक का आहे ? जाणून घेऊया.

1926 मध्ये वाल्डो सेमॉन नावाच्या वैज्ञानिकाने पीव्हीसीला प्लास्टिकमध्ये रुपांतर केले होते. पीव्हीसी म्हणजे पॉलिविनाइल क्लोराइडचा उपयोग बिल्डिंग मटेरियल बनविण्यासाठी होता

पीव्हीसी गॅसमुळे डोळ्यांची आग होणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे सारख्या गोष्टी होतात. जे फॅक्ट्री जवळ होते, त्या लोकांचा या घटनेत मृत्यू झाला. स्टायरीन केवळ गॅस नसून, ते सॉलिड अथवा लिक्विडच्या रुपात कोणत्याही वस्तूमध्ये मिसळले जाऊ शकते. हे फळ, भाज्या, मांस इत्यादींमध्ये मिसळू शकते. मात्र याचा स्तर कमी असतो. स्टायरीन एक रंगहीन तरळ पदार्थ आहे, जो हवेच्या संपर्कात येताच गॅस बनूनन हवेत पसरतो. याचा गोड असा सुंगध येतो. मात्र अनेक कंपन्यांमध्ये यात एल्डीहाइड्स गोष्टी मिसळल्याने याचा दुर्गंध येत असतो.

स्टायरीनचा सर्वाधिक उपयोग पॅकेजिंग मटेरियल, इलेक्ट्रिकल इंसूलेशन, फायबर ग्लास, प्लास्टिक पाइप्स, ऑटोमोबाईल पार्ट्स, चहाचा कप इत्यादी बनविण्यासाठी होतो. हा गॅस हवा, पाणी कशाच्याही मार्फत शरीरात घुसू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments