Thursday, August 7, 2025
HomeMain Newsजवान सूरज लामजे अपघातात हुतात्मा

जवान सूरज लामजे अपघातात हुतात्मा

जिल्ह्यातील काळोशी गावाचे जवान सूरज लक्ष्मण लामजे (वय २८) यांना लडाख भागात झालेल्या एका अपघातात वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी काळोशी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काळोशीचे उपसरपंच समीर डफळ यांनी यासंबंधी माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज लक्ष्मण लामजे हे लेह भागात कर्तव्यावर होते. ते मालवाहू वाहनातून साहित्य घेऊन जात असताना शुक्रवारी त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांना वीरमरण आले.

सूरज लक्ष्मण लामजे हे २०१४मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. लष्कराच्या वाहतूक विभागात ते चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, बहिण, भाऊ असा परिवार आहे.

मुलाचे तोंड पाहण्याआधीच जवान सूरज यांना वीरमरण –

चार महिन्यांपूर्वी सूरज लक्ष्मण लामजे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच ते सुट्टीवर गावी येणार होते. पण त्याआधीच त्यांचा अपघातात मृत्यू झाला. आज सायंकाळी गावात अंत्यविधी होणार असल्याचे उपसरपंच डफळ यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments