सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून कर्मवीर हाऊसिंग सोसायटी येथे प्रभाग क्रमांक एक च्या नगरसेविका सौ सीता हादगे.यांच्या संकल्पनेतून व सहकारी नगरसेवक राजू आप्पा भोसले यांच्या सहकार्याने आणि
नगराध्यक्षा माधवीताई कदम यांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या मल्टीपर्पज हॉल या कामांचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २३/१०/ 2020 रोजी कर्मवीर हाऊसिंग सोसायटी येथील ओपन स्पेस या ठिकाणी करण्यात आला
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष माधवीताई कदम उपनगराध्यक्ष किशोर तात्या शिंदे
बांधकाम सभापती मिलिंद काकडे सर्व समित्यांचे सभापती तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या वेळी महाराज साहेब म्हणाले 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येथील स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून याठिकाणी नगरपालिकेच्या असणाऱ्या दहा गुंठे जागेमध्ये एक सुसज्ज हॉल,गार्डन,ओपन जिम,इत्यादी विकास कामे करून या परिसराचा टप्प्याटप्प्याने या भागातील विकास नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल,असेआश्वासन त्यावेळी दिले होते ,त्याची आज वचन पूर्तता करताना मनापासून आनंद होत आहेअसे आवर्जून महाराज साहेब म्हणाले निवडणुकीच्या दरम्यान प्रभागातील नगरसेवक राजू आप्पा भोसले .नगरसेविका सौ सीता हादगे यांनी या विकास कामाकरिता नगराध्यक्षा माधवीताई कदम यांना या कामाचा पाठपुरावा करून त्यांच्याकडून त्यांच्या असणाऱ्या राखीव निधीतून सुमारे 65 लाख रुपये या विकास कामावर त्यांनी दिले त्याबद्दल नगरसेविका सौ सीता हादगे यांनी त्यांचे आभार मानले तसेच हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच सहकारी नगरसेवक नगरसेविका त्यांनी जे सहकार्य केले,त्याबद्दल नगरसेविका सीता हादगे यांनी आभार मानले
काही महिन्याच्या कालावधीमध्ये एक सुंदर आणि छान अशी वास्तुचा लोकार्पण सोहळा घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष माधवीताई कदम यांनी यावेळी दिले*,
त्याचबरोबर या इमारती व्यतिरिक्त शिल्लक जागेमध्ये गार्डन,ओपन जिम,इत्यादी कामे या ठिकाणी लवकरच करून घेऊ असे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राजू भोसले यांनी सांगितले .
या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांचे आभार ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब पोळ यांनी मानले.