सातारामध्ये उभ्या केलेल्या जंबो कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्धघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडले . या हॉस्पिटल मध्ये २३४ ऑक्सिजन बेड व ५२ आसीवो बेड आहेत . डायलिसिसवरती असणाऱ्या रुग्नांना रुग्नालये दाखल करून घेत नाहीत . अशा रुग्नांनासाठी हि चार बेडची सोय करण्यात आली आहे . रुग्नांची तपासणी करून या रुग्नालयात उपचार केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले . या समारंभाला मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री श्री . अजित पवार ,आरोग्य मंत्री श्री . राजेश टोपे ,ऑनलाईन उपस्थितीत होते . तसेच पालक मंत्री नामदार बाळासाहेब पाटील ,गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ,खासदार श्रीनिवास पाटील ,आमदार श्रीमंत छ . शिवेंद्रराजे भोसले ,आमदार जयकुमार गोरे ,आमदार मकरंद पाटील ,आमदार दीपक चव्हाण ,व मान्यवर उपस्थितीत होते .