Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedचित्रा वाघ यांनी ज्याचा फोटो Adult Star म्हणून दाखवला, तो अब्रु नुकसानीचा...

चित्रा वाघ यांनी ज्याचा फोटो Adult Star म्हणून दाखवला, तो अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार!

ठाणे, रत्नागिरीमध्ये एकीकडे उमेदवारी, निवडणूक प्रचारावरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये पॉलिटिकल कॅम्पेनवरुन चांगली जुंपली आहे. ‘पॉर्न स्टार’ शब्दावरुन लोकसभा निवडणुकीत राज्यात आता वाद सुरु झालाय. भाजपच्या चित्रा वाघ यांनी थेट फोटोच दाखवत उद्धव ठाकरेंच्या निवडणुकांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतलाय. यामुळे अभिनेते  प्याराली उर्फ राज नयानी हे व्यथित झाले आहेत. त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना गंभीर इशारा दिलाय.

उद्धव ठाकरेंकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीत हीच व्यक्ती महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार असं विचारत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. चित्रा वाघ यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली.. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडूनही चित्रा वाघ यांना त्याच पद्धतीनं उत्तर देण्यात आलंय.

भाजपने सेक्स स्कँडलप्रकरणातल्या प्रज्ज्वल रेवन्नावर बोलावं असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय.सुषमा अंधारेंनी तर या वादात भाजपच्या उमेदवार नवनीत राणांनाही खेचलं होतं. यासोबतच ठाकरे गटाकडून कंगना रनौतलाही या प्रकरणी ओढण्यात आलंय त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे..

चित्रा वाघ यांनी पॉर्न स्टारचे फोटो दाखवल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने रेवन्नांचं सेक्स स्कँडलच दाखवून दिलंय..  प्रचाराच्या रणधुमाळीत पॉर्नवरुन केलेल्या आरोपांनंतर महिला नेत्यांमध्ये मात्र चांगलीच जुंपलीय

मी एक चरित्र अभिनेता आहे. माझ्या वाट्याला ज्या भूमिका येतात, त्या मी करतो. दरम्यान चित्रा वाघ यांनी माझा पॉर्नस्टार उल्लेख करुन एका कलावंताचा अपमान केलाय. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी हे केलंय. त्यांनी येत्या 2 दिवसात माझी माफी मागावी अन्यता मी इच्छा नसतानाही त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन असा इशार त्यांनी दिलाय.

चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. भूमिकेची मागणी असेल त्याप्रमाणे अभिनेता अभिनय करतो, याची त्यांना माहिती असावी. त्यांनी केलेल्या दाव्याची मी निंदा करतो. माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेत असल्याचे ते म्हणाले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments