१५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना मानव विकास निर्दशकांचा विचार ,विविध योजनांचे अभिसरण करावे . गावातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची पुर्तता झाली पाहिजे ,यासाठी आराखडा लोकसहभागातून बनला पाहिजे , प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले . वर्ये ,ता . सातारा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत आमचे गाव ,आमचा विकास कार्यक्रमातंर्गत विस्तार अधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबधीचे प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्दघाटन कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे ,सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण , विस्तार अधिकारी संदीप दीक्षित उपस्थितीत होते .
पुढे बोलताना गौडा म्हणाले ,ग्रामविकास आराखडे बनवित असताना विस्तार अधिकारी यांची महत्वाची भूमिका आहे . त्यांनी गणस्तरावर ग्रामसेवक व सरपंचाना प्रशिक्षण देत असताना गावातील गरजांचा विचार करूनच आराखडे बनवण्याचे प्रशिक्षण द्याचे आहे . त्याचबरोबर अनेक विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासकाची जबादारी असल्याने त्यांना स्वतःला आराखडे बनावाचे आहेत . जलजीवन मिशन योजनेचा समावेश करून मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के नळजोडणी पूर्ण होईल . असा प्रयत्न करावा . तसेच स्वच्च भारत मिशन अंतर्गत योजनेचे अभिसरण करून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्याबाबतच्या तरतुदी ग्रामपंचायत विकास आराखड्यात कराव्यात .
अविनाश फडतरे म्हणाले ,ग्रामपंचायत विकास आराखड्यातील बंधित व अबधित निधीचा अभ्यास करून लोकसभागातून जल पुनर्भरण ,स्वच्छता ,घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवावे . विविध योजनांचे अभिसरण करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा . महिला बचत गट , तरुण आणि शेतकऱ्यांचा उत्त्पन्न वाढीच्याच्या दृष्टीने मानव विकास निर्देशकांनुसार उपजीविकेची साधने निर्माण करणे गरजेचे आहे . कोरोनाच्या पार्शवभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे नियम असल्याने ग्रामसभा घेता येत नाहीत . पण वार्ड सभा ,महिला सभा ,बाल सभा ,आणि वंचित घटकांच्या सभा घेऊन त्यांनी मांडलेले प्रश्न आणि मागण्यांचा विचार करून त्याप्रमाणे विशेष मासिक सभेत आराखडे तयार करण्यात यावे , असे फडतरे यांनी सांगितले
सुवर्णा चव्हाण बोलताना म्हणाल्या ,विस्तार अधिकाऱ्यांना जबाबदारी असलेल्या प्रशासकांनी ग्रामसंसाधन गटांचा प्रभावी वापर करून विकास आराखडा तयार करावा . यावेळी गरमविकास अधिकारी संजय जाधव यांनी सूत्रसंचलन व आभार मानले . प्रवीण प्रशिक्षक प्रदीप पाटणकर , किरण कदम ,विनोद भागवत ,स्वप्नील शिंदे ,यांनी विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधित प्रशिक्षण दिले .