Sunday, August 10, 2025
HomeMain Newsगुगल पेच्या माध्यमातून आता मोफत करता येणार नाही पैसे ट्रान्सफर

गुगल पेच्या माध्यमातून आता मोफत करता येणार नाही पैसे ट्रान्सफर

गुगल पे’द्वारे जर तुम्ही पैशांचा व्यवहार करत असाल तर ही तुमच्यासाठीच आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या गुगल पेने घेतला असून कंपनीकडून या बदल्यात इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. युजर्सना ज्यासाठी काही पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान हे शुल्क किती असेल याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

माध्यमांच्या अहवालानुसार Google Pay किंवा pay.google.com वरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा सध्या देण्यात येते. दरम्यान WEB APP बंद करण्याची घोषणा गुगलकडून नोटीस जारी करत करण्यात आली आहे. परिणामी 2021 च्या सुरुवातीपासून युजर्स Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही. युजर्सना याकरिता गुगल पेचा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे गुगलकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, गुगल पेच्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.

एखाद्या बँक खात्यामध्ये जेव्हा तुम्ही पैसे पाठवता तेव्हा पैसे ट्रान्सफर होण्यास एक ते तीन दिवस लागतात. डेबिट कार्ड वापरून त्वरित हस्तांतरित केले जाते. कंपनीने सपोर्ट पेजना अशी घोषणा केली आहे की, जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने पैसे पाठवता तेव्हा 1.5 टक्के किंवा 0.31 डॉलर शुल्क आकारले जाते. आता इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर गुगलकडून चार्ज घेतला जाऊ शकतो. दरम्यान गेल्या आठवड्यात गुगलकडून काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. अँड्रॉइड आणि ios युजर्ससाठी हे सर्व फीचर रोलआउट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गुगल पेच्या लोगोमध्ये देखील कंपनीने बदल केले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments