खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली आहे. उदयनराजे यांनी शिवेद्रसिंहराजे यांच्या सुरुची या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. अनेक वर्षांनंतर या दोघांमध्ये ही भेट झालीये. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडी नंतर दोन्ही राजेंनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार शिवेंद्रराजे यांचा आधी उदयनराजे भोसले यांच्या जागेला विरोध होता. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले यांच्या विरोधातील सर्व अर्ज मागे घेतले गेले.
दुसरीकडे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड