लपून छपून भाजपत प्रवेश करणार नाही. इच्छा झाली तर शरद पवारांशी चर्चा करूनच जाईल,’ असे विधान गेल्या महिन्यात आमदार एकनाथ खडसे यांनी केले होते . त्यानुसार त्यांनी दाेन दिवस मुंबईत शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण ती होऊ शकली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ‘आपला भाजप प्रवेश राज्यात नव्हे, तर दिल्लीत वरिष्ठांच्या उपस्थितीत येत्या पंधरा दिवसांत होईल’ असे त्यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना नमूद केले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये