Sunday, August 10, 2025
HomeMain Newsकोविडमुळे जगात दीड कोटी, तर भारतात ४७ लाख मृत्यू

कोविडमुळे जगात दीड कोटी, तर भारतात ४७ लाख मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी सांगितले, की गेल्या दोन वर्षांत (२०२०-२१) सुमारे दीड कोटी लोकांनी एकतर कोरोना विषाणूमुळे किंवा कोरोनामुळे आरोग्य प्रणालींवर झालेल्या परिणामामुळे आपला जीव गमावला आहे.

आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

तथापि, या अकड्यांवर आणि आरोग्य संघटनेच्या गणितीय मॉडेलच्या वापरावर भारताने जोरदार आक्षेप घेतला आहे. भारताने म्हंटले आहे की वापरलेले मॉडेल आणि डेटा संकलनाची पद्धत संशयास्पद आहे.

नवी दिल्लीतील सूत्रांनी सांगितले की, भारत हा मुद्दा जागतिक आरोग्य सभा आणि आवश्यक त्या जागतीक  मंचांसमोर मांडू शकतो.

डब्ल्यूएचओच्या अहवालातील हे आकडे विविध देशांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीच्या दुप्पट आहे.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, दक्षिणपूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेत मृत्यूच्या एकूण घटनांपैकी सुमारे ८४ टक्के मृत्यूची नोंद झाली आहे.

अहवालानुसार, यापैकी १५ टक्के मृत्यू उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, २८ टक्के उच्च-मध्यम-उत्पन्न देशांमध्ये, ५३ टक्के कमी मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणि ४ टक्के कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले आहेत.

अहवालानुसार, भारतात कोविडमुळे ४७ लाख मृत्यू झाले आहेत. हे अधिकृत आकडेवारीच्या १० पट आहेत आणि जागतिक स्तरावर कोविडमुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ एक तृतीयांश आहे. २०२० मध्येच सुमारे ८.३ लाख मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयीयस यांनी हे आकडे ‘गंभीर’ असल्याचे म्हटले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments