कोरेगाव येथील एसटीचे आगर व्यवस्थापक भुताळे हे गेल्या पाच वर्षांपासून एका कंडक्टर महिलेवरती पाच वर्षापासून बलात्कार करीत असल्याचा प्रकार नुकताच कोरेगाव येथे उघडकीस आला असून . याबाबत कोरेगाव आगर प्रमुख पृथ्वीराज भूताळे यांच्यावर सातारामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकरणी पुढील तपासासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांकडून तपास वर्ग करण्यात आला आहे . या प्रकरणी पीडित महिलेला घेऊन तळेगाव दाभाडे पोलीस कोरेगाव एसटी महामंडळाच्या आज आगारात दाखल झाले व वेगवेगळ्या प्रकारे सदर गुन्ह्याबाबत माहिती गोळा केली . सदर प्रकरणात दोषी भूताळे वर कडक कारवाही व्हावी व पीडित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी समाजामधून होत आहे .