Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedकोयना जलाशयात वादळी वाऱ्याने स्पीड बोट पलटी होऊन एकाचा मृत्यू

कोयना जलाशयात वादळी वाऱ्याने स्पीड बोट पलटी होऊन एकाचा मृत्यू

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठी दुर्घटना घडली आहे . वादळी वाऱ्यात स्पीड बोट पलटी होऊन एक जण जलाशयात बुडाला असून दोघेजण सुदैवाने बचावले आहेत . स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला ,मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे शोधकार्यात अडथळे आले . या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले . याबाबतची माहिती अशी की ,कोयना जलाशयावर तापोळा ते आहेर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे . यावेळी कामाची पाहणी करण्यासाठी काही अधिकारी बोटीने तापोळ्याला गेले होते . पुलाच्या कामाची पाहणी माघारी येत असताना तेटली हद्दीत वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोट जलाशयात पलटी झाली . यावेळी गजेंद्र बबन राजपुरे वय ४२ वर्ष रा . दरेवाडी वाई ;यांचा बुडून मृत्यू झाला . सतीश थोरवे वय ५२ रा . वाई ,बालेश्वर महातो वय ४२ हे बचावले आहेत . आधारामुळे शोध मोहीम थांबवली असल्याने जलाशयात बुडून मुर्त्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडलेला नाही . रात्री उशीरा पर्यंत शोध मोहीम सुरु होती . आज परत  शोध मोहीम सुरु केली जाणार आहे .

हद्दीत घडलेल्या या घटनेत कंपनीचे दोन अधिकारी बचावले ,मात्र एकाचा बुडून मृत्यू झाला  त्यांनी लाईफ जॅकेट परिधान केले नव्हते का ? बोट मालक कोण होता . बोट चालकाकडे प्रवाशी वाहुतुकीचा परवाना होता का  ? अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments