Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीला सापडला गांजा

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीला सापडला गांजा

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील घरी छापा टाकला असून या छापेमारीत तिच्या घरात गांजा सापडला आहे. कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने छापा टाकला. एनसीबी अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात कारवाई करत आहे.

यासंदर्भात एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अटकेत असलेल्या ड्रग्स पॅडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला. एनसीबीला एक संशयास्पद पदार्थ (गांजा) छापा दरम्यान सापडला आहे. आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नावे बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणात समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपाल पर्यंत अनेकांची चौकशी झाली. एनसीबीची ही कारवाई अजूनही सुरु आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments