उत्तम प्रशासनाचा विचार करता ‘केरळ’ हे देशातील सर्वोत्तम राज्य असून त्यानंतर तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक गुजरात यांचा नंबर लागतो. तर महाराष्ट्र राज्य ७ व्या क्रमांकावर आहे. पब्लिक अफेअर सेंटरने (पीएसी) जाहीर केलेल्या पब्लिक अफेअर इंडेक्स – २०१८ नुसार हे अग्रक्रम जाहीर करण्यात आले आहेत.
२०१६ पासून दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या या इंडेक्सने, उपलब्ध माहितीच्या आधारे तसेच आराखड्यावरून राज्यातील प्रशासकीय कामाची पाहणी केली. यानंतर, सामाजिक आणि आर्थिक विकासावरून त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत.
पब्लिक अफेअर्स सेंटर (PAC)ने प्रसिद्ध केलेल्या पब्लिक अफेअर्स इंडेक्स २०१८नुसार देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून केरळने सलग तिसऱ्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे. या यादीत बिहारला सर्वोत शेवटचा क्रमांक मिळाला आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित एकूण ११ विविध मुद्दयांचा विचार करून हा इंडेक्स तयार करण्यात आला आहे.
या अहवालात गुजरात सहाव्या स्थानावर तर महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. ज्या ११ घटकांचा विचार करण्यात आला आहे त्यात महाराष्ट्र मागे असल्याचे पीएआयच्या अहवालात म्हटले आहे. नव्या उद्योगासाठीचे वातावरणाचा विचार करता महाराष्ट्राने गुजरातच्या पाठोपाठ दुसरे स्थान मिळवले आहे.
इंडेक्समध्ये बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांनी शेवटचा क्रमांक मिळवला आहे. लहान राज्यांचा विचार करता (लोकसंख्या २ कोटींपेक्षा कमी) हिमचाल प्रदेश, गोवा, मिझोरम, सिक्कीम, त्रिपूरा ही राज्ये अव्वल ठरली आहेत.
देशातील सर्वोत्तम राज्य कोणते हे निश्चित करण्यासाठी मुलांच्या विकासाठीचे वातावरण, पर्यावरणाचा विकास, नव्या उद्योगासाठीचे वातावरण, राज्याचे आर्थिक व्यवस्थापन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, न्यायमिळण्याचे प्रमाण, कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालविकास, सामाजिक सुरक्षा, मानव विकास निर्देशांक, पायाभूत सोई-सुविधा या ११ घटकांचा विचार करण्यात आला.
या सर्व क्षेत्रांचा विचार करता केरळ राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी या इंडेक्समध्ये केरळने पहिले स्थान मिळवले आहे. केरळ पाठोपाठ तामिळनाडू दुसऱ्या तर तेलंगणा तिसऱ्या स्थानावर आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकने अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले.