केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले , ते ७४ वर्षाचे होते त्यांचे पुत्र लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करून याची माहिती दिली . गेल्या महिन्याभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते . नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाहि झाली होती . तेव्हापासून यांची प्रकृती चिंताजनक होती . बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून यांची ओळख होती . अनेक वर्षाच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी व्ही .पी सिंग ,एच . डी .दैवीगौडा ,इंद्रकुमार गुजराल ,अटलबिहारी वाजपेयी ,मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबीनेटमध्ये काम केले . अशी उज्वल राजकीय कारकीर्द असलेले रामविलास पासवान हे कदाचित देशातील एकमेव नेते असतील .
राजकारणाची नस पकडलेले रामविलास पासवान पहिल्यादा १९६९ मध्ये आरक्षित मतदारसंघातून संयुक्त सोशालिस्ट पार्टीकडून बिहारच्या विधानसभेत पोचले होते . १९७४ मध्ये राज नारायण ,आणि जयप्रकाश नारायण यांचे खंदे अनुयायी म्हणून ते लोकदलाचे सरचिटणीस बनले . राज नारायण ,कर्पुरी ठाकूर आणि सत्येंद्र नारायण सिन्हा सारख्या आणिबाणीतील प्रमुख नेत्यांचे ते जवळचे सहकारी होते .