सातारा येथील कास पठार हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आल्यापासून जगभरातून पर्यटक इथे येत असतात . हे जरी सातारच्या दृष्टीने अभिमानाचे असले तरी येणारा पर्यटक निर्सगाचा आनंद घेण्याऐवजी निसर्गाची हानी करताना जास्त दिसत आहे . कासला गाड्यांच्या धुराचे प्रदूषण ,प्लास्टिक कचरा याचे जास्त प्रमाण वाढलेले दिसत आहे . नैसर्गिक शुद्ध हवेचे कास काही दिवसांनी प्रदूषणाचे माहेरघर होऊ नये . याची भीती मनात येत असते . येणार पर्यटक हा निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी मद्यधूंद अवस्थेत कायमच बघण्यास मिळतो . रस्त्याच्या कडेला उभा राहून दारू पिणे ,कपडे काढून उघडे नाचणे ,दारु पिऊन वेगाने वाहने चालवणे ,ट्रॅपिकचे कोणतेही नियम न पाळणे ,या मुळेच वारंवार अपघाताच्या घटना कास रोडला घडताना दिसत आहेत .
सातारला पर्यटक हे पुण्या मुंबई वरून येणारे जास्त असतात . कास हे ठिकाण दारू पिऊन धिगाणा करण्याचे ठिकाण म्हणूच प्रशिध्द होत आहे . बऱ्याच वेळा गाड्या चालवणारे मद्यधूंद अवस्थेत असतात . वाहने चालवताना ते भानावर नसतात . याचा तोटा इतर वाहधारकांना अपघाताच्या रूपाने सोसावा लागतो . सातारा ते कास रोडवरती बोगद्यापासून पुढे घाटात अनेक प्रेमी युगल चाळे करीत बसलेले असतात . त्यांची वाहने बाजूला पार्क केल्यामुळे रस्ता अपुरा पढतो आणि अपघात पण होत असतात . अलीकडेच मोबाईल मुळे तरुणांना नेहिमीच सेल्फीची भुरळ पडलेली असते . रस्त्याच्या मधोमध गाड्या लावून फोटो काढणे ,दारू पिऊन नाचणे हे नेहिमीच पाहण्यास मिळत असते . या रस्त्यावर कुढेच पोलीस चेक नाका किंवा पोलीस चौकी नाही . त्यामुळे कुणालाच धाक राहिलेला नाही . नियम राहिलेले नाहीत . आणि अपघात होण्याची हि मूळ कारणे आहेत . पुण्याच्या गाड्या नेहिमीच नियमाचे उलंघन करीत असतात .
परंतु पोलिसांकडून कोणतीच कारवाही होताना दिसत नाही . हा घाटमाध्यावरचा वळणाचा ,रस्ता असल्याने या रस्त्यावर कॅमेरे बसवून ६० स्पीडची मर्यादा ठेवली पाहिजे . जो पर्यंत असे नियम होणार नाहीत तो पर्यंत कुणीच आपली वाहने नियमाने चालवणार नाही . नाहीतर असेच अपघात भविष्यात होत राहणार . आनंदाच्या नावाखाली अनेकांचे जीव जात राहणार आहेत . बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून बऱ्याचदा चांगल्या कौटूंबिक पर्यटकाला त्रास सहन करावा लागतो . कास तलाव हा तर दारुड्याचा अड्डाच झालेला आहे .आणि हेच लोक प्लास्टिक कचरा रस्त्यावर तलावाच्या बाजूने फेकत असतात . आणि आम्ही सातारकर जर वाशी पोती घेऊन हा कचरा उचलण्यास जातो . यासाठी कास तलाव व परिसरात कचऱ्यासाठी जागोजागी मोठ्या कुंड्या ठेवणे गरजेचे आहे . जेणेकरून आपण आणलेला कचरा या कुंड्यांमधून पर्यटकांना टाकता येईल . व सगळीकडे पसरलेला कचरा दिसणार नाही . आणि हे होणारच नसेल तर कास पठार परिसरात प्लास्टिकला बंदी घातली तरच पर्यावरणाचा समतोल राहू शकतो .
कासच्या धरणाच्या वरती गाड्या घेऊन जाऊन रील करणे ,अशा पर्यटकांना दंड आकाराला पाहिजे ,कास तलावामध्ये गाड्या घालून धुणे या मुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे . असे प्रदूषण करणाऱ्या पर्यटकांसाठी नगरपालिकेने नियमावली तयार करणे गरजेचे आहे . पर्यावरणाचा आनंद घेत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही .यांचेकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे . कास रस्त्यावरती अलीकडच्या काळात झालेल्या अपघातामध्ये तरुण मुले जास्त मुर्त्यूमुखी पडलेली आहेत . रील करत धबधब्याच्या जवळ जाणे ,वाहने बेधूंद चालवणे यामुळेच जास्त अपघात होत आहेत . रील करताना तरुणांनानी आपली शेवटची रील होऊ नये यासाठी काळजी घ्यावी . हे सर्व थांबवयचे असेल तर पोलीस,नगरपालिका व जिल्हा प्रशासन यांनी मिळून नियमावली तयार करणे गरजेचे आहे . अशा घडणाऱ्या घटनांना पायबंद घालणे गरजेचे आहे .