Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकामाठी पुरा येथील विजेच्या खांबामध्ये करंट उतरल्याने नागरिकांमध्ये घबराट

कामाठी पुरा येथील विजेच्या खांबामध्ये करंट उतरल्याने नागरिकांमध्ये घबराट

गोडोली येथील कामाठी  पुरा परिसरातील   संत गाडगे महाराज समाजसेवा संस्थेच्या पाठीमागील बाजूस सर्वे नंबर ८९ मधील विजेच्या खाबांवर  असलेल्या सर्व्हिस वायर  पेटून तुटलेल्या तारांमुळे  मोठा अनर्थ टळला आहे . कामाठी  पुऱ्यातील विजेच्या खांबानांच्या   वायरची झालेली दुरावस्था  वेळोवेळी नागरिकांनी तक्ररी  देऊन  समक्ष  अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदने देऊन  केलेली  आहे . परंतु जाणीवपूर्वक महावितरण कंपनी कडून या कडे दुर्लक्ष केले जात आहे .

रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सर्व्ह  नंबर ८९ मधील सुभाष साळुंखे यांच्या घरासमोर सर्व्हिस वायर  मध्ये बिघाड झाल्यामुळे सर्व्हिस वायरने अचानक पेट घेतला . या परिसरातील विजेच्या खांबानामध्ये  शॉर्ट सर्किट मुळे  विजेचा  प्रवाह सुरु झाला . या खांबाला काही नारिकानी  लोखंडी वायर कपडे वाळण्यासाठी  बांधली होती . या बांधलेल्या तारणांमध्ये  करंट आल्याने तारेवर वाळत टाकलेली सर्व कपड्यांनी  पेट घेतला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ  घबराटीचे वातावर  तयार झाले . या परिसरातील काही सजग नारिकांमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे . स्थानिक नगरसेवक शेखर मोरे पाटील  यांनी तात्काळ हालचाली केल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे .  या परिसरात ऐकून चार विजेचे खांब आहेत . या सर्व खांबांवरील तारा या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत . जर यामध्ये प्रशासन व महावितरण कंपनीने दखल घेतली नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे महावितरण कंपनीने विजेचे खांब व त्यावरती टाकण्यात आलेल्या सर्व्हिस वायर ,त्याचबरोबर नागरिकांना या खांबावरून दिलेले विजेची कनेक्सन याची तपासणी करावी  सध्या  या खाबांमधून करंट येत असून तो त्वरित बंद करावा.

सध्या लहान मुले या परिसरात रस्त्यांवर खेळत असल्याने चुकून जर एखाद्या मुलाने खांबाला हात लावला तर हे त्या लहान मुलांच्या जीवावरती बेतू शकते .पुढील दुर्घटना टाळ्यांसाठी  या परिसरातील सर्व खाबांची पाहणी करून व तपासणी करून सर्व सर्व्हिस वायर बदलाव्या जेणेकरून कोणतीही मोठी हानी होणार नाही . अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments