यात्रा जत्रा लग्न समारंभ गणेश उत्सव त्यामधील सर्व क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम बंद झाले . त्यामुळे शासनाने कलाकारांना मदत करावी अशी मागणी
कलाकार महासंघाच्या सदस्यांनी केली . महासंघायच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शंख ध्वनी आंदोलन करण्यात आले . यावेळी कलाकार महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे रामचंद्र जाधव ,सुनील वाढेकर ,कैलास जाधव ,बाळासाहेब जाधव ,यांच्या सह सातारा जिल्ह्यातील कलाकार उपस्थितीत होते . गेल्या सहा महिन्यापासून कलाकारांचा उदरनिर्वाह बंद आहे . लॉक डाऊन करण्यात आल्या मुले यात्रा जत्रा समारंभ ,गणेश उत्सव यामध्ये कलाकारांचे कार्यक्रम बंद झाले आहेत . कलाकार घरात बसून प्रशासनाला सहकार्य करीत आहेत . कलाकारानाची कला सादर झाली तर त्यांच्या कुटुबांचा उदरनिर्वाह होतो . परंतु घरीच बसून राहिल्या मुले कलाकार व मालक लोकांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे . शासनाने या कलाकारांना मदत करावी अशी मागणी यावेळी महासंघांचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी केली व अडचणीत सापडलेल्या कलाकारांना यातून शासनाने बाहेर काढावे अशी मागिणी करण्यात अली .