Thursday, August 7, 2025
Homeमनोरंजनएवढ्या कोटींची उलाढाल करतो कपूर खानदानाचा ‘जावईबापू’

एवढ्या कोटींची उलाढाल करतो कपूर खानदानाचा ‘जावईबापू’

काही दिवसांतच कपूर कुटुंबात सनईचौघड्यांचे सुमधुर सूर घुमणार असून अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरच्या लग्नाची तारीख मंगळवारी जाहीर करत कपूर कुटुंबीयांनी सोनम आणि आनंद आहुजाच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. बॉलिवूडच्या या ग्रँड वेडिंगची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सर्वचजण सोनम आणि आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी उत्सुक आहेत. सोनमला विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये अनेकदा आनंदसोबत पाहिले गेले. मात्र आनंद हा अभिनय क्षेत्रातील नसल्यामुळे त्याच्याबद्दल फार काही माहिती कोणाला नाही. पण आम्ही आज तुम्हाला सोनमच्या होणाऱ्या पतीविषयी काही माहिती सांगणार आहोत.

दिल्लीतील प्रतिष्ठित व्यावसायिक हरिश अहुजा यांचा आनंद अहुजा हा मुलगा असून देशातील सर्वात मोठ्या शाही एक्सपोर्ट्स या निर्यात कंपनीचा तो मालक आहे. तो सध्या या कंपनीत व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहे. अमित आणि अनंद अहुजा असे दोन धाकटे भाऊ त्याला आहेत. आनंदने दिल्लीतील अमेरिकन अॅम्बेसी स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले तर त्याने पेन्सिलव्हॅनिया विद्यापिठातून अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयातून पदवी घेतली. त्याने व्हर्टन या प्रख्यात बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्याने दिल्लीत परतण्याआधी अमेरिकेत अॅमेझॉन डॉटकॉमसाठी काम केले. त्याने दिल्लीला परल्यानंतर वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचा विचार केला.

तो कापडाचा प्रसिद्ध ब्रँड भानेचा संस्थापक असून ‘वेज नॉनवेज’ या स्निकर बुटीकचाही मालक आहे. आनंदच्या शाही एक्सपोर्ट या कंपनीची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींची असून आनंदची सोनमशी २०१४ मध्ये भेट झाली. आनंदची सोनमशी ओळख फॅशन डिझायनर आणि सोनमची स्टायलिस्ट प्रेरणा कुरेशीने करून दिली होती. सोनमला त्याने प्रपोज केले असे म्हटले जाते. पण त्याच्या या प्रपोजलचे उत्तर देण्यासाठी सोनमने बराच वेळ घेतला. सोनमचे फोटो आणि तिच्या चित्रपटांविषयीचे बरेच पोस्ट आनंद त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments