पुण्यावरून पलुसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी डांबरावर घासत गेली . त्यामुळे स्पार्कींग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला . हि घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता भुईंज ता . वाई येथे घडली पुण्याहून पलुसकडे एसटी निघाली होती . एसटीमध्ये प्रवाशी खचाखच भरले होते . महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एसटी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला . डंबारवर दुचाकी घासत गेल्याने स्पार्किंग झाले . त्यामुळे दुचाकीला आगा लागली . एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वर अडकल्याने त्याला हि बाहेर निघता आले नाही . एसटीला हि आग लागल्याने समजताच चालक व वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले . घाईगडबडीत प्रवाशाच्या बॅगा एस्टीमध्येच राहिल्या . प्रवाशांनी खिडकीतून ,दरवाज्यातून उड्या मारून आपला जीव वाचवला . सर्व प्रवाशी व चालक वाहकाने खाली उतरून अग्नीशमान दलाला याची माहिती दिली . पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले . काही क्षणातच संपूर्ण एसटी आगीच्या भक्ष स्थानी पडली . वाई नगरपरिषद व भुईज कारखाना येथून अग्नीशमन दलाची गाडी घटना स्थळी आली . त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली . मात्र तोपर्यंत एसटीसह दुचाकी स्वार हि जळून खाक झाला . त्या मृत दुचाकीस्वाराची रात्री उशीरा पर्यंत पोलिसांना ओळख पटली न्हवती . भुईंज पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत .