Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रएक्स्प्रेस वे टोलवसुली कधी बंद करणार?,कोर्टाने सरकारला फटकारलं

एक्स्प्रेस वे टोलवसुली कधी बंद करणार?,कोर्टाने सरकारला फटकारलं

मुंबई पुणे एक्स्प्रेस टोलवसुली बंद करणार की नाही याचा अंतिम निर्णय कधी घेणार हे आम्हाला सोमवारी कळवा अशा शब्दात निर्णय घेण्यास चालढकल करणाऱ्या  राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे.

एक्स्प्रेस वे वरची टोलवसुलीसाठीची निर्धारित रक्कम वसूल झाली असून टोलवसुली बंद झाली पाहिजे अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी दाखल केली आहे. तसंच या एक्स्प्रेस वेचं कंत्राट ज्यांना दिलं आहे हे वाहतूक झालेल्यापेक्षा वाहनांची संख्या कमी दाखवतात असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

एक्स्प्रेस वे वर किती वाहनांची ये जा झाली याची आकडेवारी आपल्या शेऱ्यासह सादर तात्काळ करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं एमएसआरडीसीला या वर्षी मार्च महिन्यात दिला होता.

मात्र,अजूनही एमएसआरडीसीनं आकडेवारी न दिल्याबद्दल हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या शुक्रवारी हा अहवाल कधी सादर करणार ते कळवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं एमएसआरडीसीला दिले आहेत.

या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारनं टोलवसुली बंद करणार की नाही याबद्दल कधीपर्यंत निर्णय घेणार सोमवारी कळवावं असाही महत्त्वपूर्ण आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments