Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedएके गॅंगमधील ४ जण दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून तडीपार

एके गॅंगमधील ४ जण दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून तडीपार

सातारा जिल्हयातील शिरवळ पोलीस ठाणे हद्दी मध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील ४ सदस्यना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा ,पुणे,सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार केले आहे . नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत १०५ गुन्हेगारनारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे . आतीश  उर्फ राजेंद्र कांबळे ,विशाल शेखर वाडेकर ,रामा दादा मंडलिक आणि संजय विजय कोळी यांचा  समावेश असलेली हि टोळी शिरवळ परिसरात खुनाचा प्रयत्न ,जबरी चोरी ,घरफोडी ,गंभीर दुखापत पोचवून  शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे करित होती . या टोळीमुळे शिरवळ तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता . या अनुषगांने शिरवळ पोलीस ठाण्याने या टोळीविरोध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा ,पुणे ,सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा

पोलीस अधीक्षक सातारा यांनी या प्रस्थावाची चौकशी करून या टोळीतील ४ सदस्यना दोन वर्षेसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे .

हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने आंचल दलाल ,अपर पोलिश  अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर ,पोलिश निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  सातारा ,श्रेणी पो.उ . नि  तानाजी माने पो. हवालदार प्रमोद सावंत ,अमित सपकाळ ,पो .कॉ . केतन शिंदे म.. पो . कॉ . अनुराधा सणस ,शिरवळ पोलीस ठाण्याचे पो . हवालदार सचिन वीर ,आणि पो . कॉ .मंगेश मोझर यांनी योग्य पुरावा सादर केला आहे . सदरील प्रस्ताव तत्कालीन पोलीस निरीक्षक नवनाथ  मदने यांनी पाठवत विद्यमान पोलीस निरीक्षक संदीप जकताप यांनी पाठपुरावा केला आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments